आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहिम यांच्या सिनेमाला सेन्सॉरची परवानगी, नवीन नावाने होणार रिलीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('द मॅसेंजर'मध्ये गुरमीत राम रहिम)
मुंबई- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांच्या 'एसएसजी' (मॅसेंजर ऑफ गॉड) सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. परंतु त्यासाठी त्यांना सिनेमाचे नाव बदलावे लागले. गॉड शब्द सिनेमाच्या शिर्षकातून काढून टाकण्यात आले आहे. आता सिनेमाचे नाव 'मॅसेंजर ऑफ गॉड'वरून 'द मॅसेंजर' झाले आहे. नाव बदलल्याची माहिती स्वत: राम रहिम यांनी टि्वटरवर दिली. 13 फेब्रुवारी रोजी 3 ते 4 हजार थिएटरमध्ये सिनेमा दाखल होणार आहे.
सिनेमासाठी 15 ते 20 दिवसांची अॅडवान्स बुकिंग करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे. सुरुवातीला हा सिनेमा 16 जानेवारी रोजी रिलीज होणार होता, मात्र वादांमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. राम रहिम यांना देवाच्या रुपात दाखवल्याने सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. वादांमध्ये लीला सॅमसन यांनी बोर्डाच्या अध्यक्ष पदाचा रजिनामा दिला होता आणि आरोप लावला होता, की केंद्र 'एमएसजी'च्या मान्यतेसाठी दबाव टाकत आहे. शिवाय पंजाब आणि हरियाणामध्येसुध्दा सिनेमाविरोधात निदर्शने करण्यात आली होती.
पुढे वाचा, सिनेमाच्या दिग्दर्शकापासून हिरोपर्यंत राम रहिम...