मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उलाल सध्या आपल्या 'बेजुबान' या आगामी सिनेमाचे शुटिंग करत आहे. सलमानसह 'लकी: नो टाइम फॉर लव्ह'मधून स्नेहाने आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. मात्र तिला अद्याप बॉलिवूडमध्ये मोठे यश संपादन झालेले नाही. त्यामुळे तिने तेलगू, कन्नडी, बंगाली, इंग्रजी या सर्व भाषांच्या सिनेमात काम केले. स्नेहाला सौंदर्यवती
ऐश्वर्या राय बच्चनची 'हमशक्ल' म्हणूनसुध्दा ओळखले जाते.
'बेजुबान इश्क'चे शुटिंग सध्या मुंबईच्या मडमध्ये सुरू आहे. यावेळी ऑन लोकेशनवर बी-टाऊनचे अनेक सेलेब्स दिसले. स्नेहा उलालव्यतिरिक्त दर्शन जरीवाला, फरीदा जलाल, मुग्धा गोडसे, सचिन खेडकरसुध्दा सामील होते. सिनेमाचे सीन्स एका इमारतीमध्ये चित्रीत करण्यात येत होते. स्नेहाने 2010मध्ये बॉलिवूडचा 'क्लिक' सिनेमा केला होता. आता ती या सिनेमातून पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
सिनेमाविषयी दर्शन जारीवालासोबत बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितले, 'या सिनेमात तो रश्मिकांतचे पात्र साकारत आहे. तो एक हस्यमुख वडिल आहे आपल्या मुलीची जिवापाड काळजी घेतो. त्याला मुलीच्या सर्व स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असते. हा एक लव्ह-स्टोरी टाइप सिनेमा आहे.'
'बेजुबान इश्क'ला गुजराती दिग्दर्शक जसुभाई तयार करत आहेत. त्यांचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'बेजुबान इश्क'च्या Locationवर उपस्थित सेलेब्सची छायाचित्रे...