आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Mugdha Godse In Condom Fashion Show.

Pix: कंडोमपासून डिझाइन करण्यात आलेला ड्रेस परिधान करुन रॅम्पवर अवतरली ही अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंडोम फॅशन शोवेळी मुग्धा गोडसे)
मुंबईः 29 जानेवारी रोजी मुंबईत कंडोम फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हा भारतातील पहिला कंडोम फॅशन शो होता. एका प्रसिद्ध कंडोम ब्रॅण्डने हा फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये देशभरातील अनेक नामवंत मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. कंडोमपासून बनवण्यात आलेल्या आउटफिट्समध्ये मॉडेल रॅम्पवर अवतरल्या होत्या.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेलिंग जगतातील प्रसिद्ध चेहरा मुग्धा गोडसे या शोची शो स्टॉपर होती. मुग्धाने परिधान केलेला ड्रेस कंडोमपासून डिझाइन करण्यात आला होता.
28 जानेवारी रोजी मुग्धाने ट्विट करुन आपल्या चाहत्यांना देशातील पहिल्या कंडोम फॅशन शोची माहिती दिली होती. एचआयव्ही आणि एड्सविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या फॅशन शोचा उद्देश होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कंडोम फॅशन शोमध्ये रॅम्पवर अवतरलेल्या मुग्धा गोडसे आणि इतर मॉडेल्सची क्लिक झालेली खास छायाचित्रे...