आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुंबई पुणे मुंबई\'च्या रिलीजला 4 वर्षे पूर्ण, स्वप्नील जोशीने ट्विट करुन मानले टीमचे आभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मुंबई पुणे मुंबई' या गाजलेल्या सिनेमाच्या रिलीजला आज चार वर्षे पू्र्ण झाली आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित हा सिनेमा आजच्या दिवशी म्हणजे 11 जून 2010 रोजी रिलीज झाला होता. यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशीने ट्विटरवर आपल्या सिनेमाचे एक छायाचित्र पोस्ट करुन ट्विट केले, ''MPM released today years ago.. But it feels like yesterday. A cult film. Thnx Satish, Mukta and Mirah for the magic.''
'मुंबई पुणे मुंबई' हा मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या सिनेमातील स्वप्नील आणि मुक्ताची हळुवार प्रेमकहाणी, त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला पडली होती. या सिनेमाची लोकप्रियता पाहून सतीश राजवाडे यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. त्यामुळे या सिनेमाच्या दुस-या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यामातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.

एक मुलगा आणि एक मुलगी भेटतात. भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये सुरू होतो मजेशीर क्षणांचा हळूवार प्रवास... अशी एक प्रेमकथा सतीशने 'मुंबई-पुणे-मुंबई'मध्ये मांडली होती. ही एका दिवसाची गोष्ट होती. दुस-या भागाची कथा पहिला भाग जेथे संपतो तेथून सुरू होणार आहे. अनेक नवीन कलाकार सिनेमाच्या दुस-या भागात दिसणार असल्याची चर्चा आहे. एकंदरीत स्वप्नील-मुक्ताचा 'मुंबई पुणे मुंबई'चा पुढचा प्रवास प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार अशी आशा व्यक्त करुया.
'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाच्या रिलीजचा चार वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने पाहुयात या सिनेमाची खास छायाचित्रे...