आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbaikar Navjyot Bandwadekar's Five Short Films Won International Award

मुंबईच्या नवज्योत बांदिवडेकरच्या पाच शॉर्ट फिल्म्सना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर त्यासाठी जिवाचे रान करण्याची जर तयारी असेल, तर मग ‘स्काय इज द लिमिट.’ शॉर्ट फिल्ममेकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास घेतलेल्या मुंबईच्या नवज्योत बांदिवडेकर या तरुणाने पदवी घेतल्यानंतर शॉर्ट फिल्ममेकिंगचे खास प्रशिक्षण घेण्यासाठी थेट अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को गाठले.

गेल्या दोन वर्षात जयपूर इंटरनॅशनल, होनोलूलू, लॉस एंजिलीस मुव्ही अवॉर्ड 2013, एशियन फिल्म फेस्ट, अँक्शन कट शॉर्ट फिल्म फेस्ट 2013 आदी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून नामांकने आणि पुरस्कार मिळाल्याने खर्‍या अर्थाने या क्षेत्रात अमेरिकेत नवज्योतच्या रूपाने भारतीय झेंडा फडकत आहे.

दादरच्या रामनारायण रुइया महाविद्यालयातून बायोकेमिस्ट्रीत पदवी घेतल्यानंतर नवज्योतने शॉर्टफिल्म मेकिंगच्या विशेष प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील ‘सॅनफ्रॅन्सिस्को स्कूल ऑफ डिजिटल मेकिंग’ या ठिकाणी प्रवेश घेतला. या ठिकाणी फिल्म मेकिंग क्षेत्रातील प्रशिक्षण त्याने घेतले. त्याने बनवलेल्या एम्मा, फ्लॉलेस आणि द चॉईस या फिल्म्सपैकी फ्लॉलेस या फिल्मला ऑक्टोबरमध्ये होणार्‍या अँक्शन कट फिल्म फेस्टिव्हलचे नामांकन मिळाले आहे. या फिल्मचा विशेष स्क्रिनिंगसाठीही या फेस्टिव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

केवळ फिल्म डिरेक्शनच नाही तर नवज्योतने सेट-डेकोरेशन, असिस्टंट डायरेक्टर, एडिटर, कथा व पटकथा लेखन, संवाद, स्थिर छायाचित्रण, साउंड अशा चित्रपटांच्या सर्व बाजूंचा सखोल अभ्यास केला असून, कामही केले आहे. याचबरोबर कर्मशियल आणि फीचर फिल्म्स बनवल्या आहेत.