आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारा सिंग यांना नाही दिसले मुमताजचे प्रेम !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारा सिंग यांनी परदेशात आपल्या कुस्तीच्या जोरावर विजयाचे झेंडे गाडल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा 'किंग काँग' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर दारा 'फौलाद' या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. मात्र पैलवानाबरोबर कोण काम करणार म्हणून अनेक अभिनेत्रींनी दारा सिंगबरोबर काम करण्यास नकार दिला. त्यादरम्यान आपल्या बहिणीबरोबर सेटवर आलेल्या मुमताजला दारा यांनी चित्रपटात घ्यायचे ठरवले. वयाच्या केवळ १४व्या वर्षी मुमताज 'फौलाद'मध्ये दारा सिंगबरोबर झळकली.
बघता बघता दारा सिंग आणि मुमताजच्या रोमान्सच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र दारा यांनी मुमताजवरचे आपले प्रेम कधीच व्यक्त केले नाही. दारा सिंग यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, प्रेमासाठी वेळ कुणाकडे आहे ? कुस्ती माझे पहिले प्रेम आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुमताजने सांगितले की, दारा यांचे अफेअर फक्त एकाच स्त्रीबरोबर होते. ती स्त्री म्हणजे त्यांची पत्नी.
दारा आणि मुमताज यांनी भलेही एकमेकांवरचे प्रेम कधीच कबूल केले नसले, तरीदेखील त्यांच्या रोमान्सच्या बातम्या एकेकाळी खूप गाजल्या होत्या.
PHOTOS : दारा सिंग यांचा जीवनप्रवास
VIDEO - दारा सिंग यांचे आठवणीतील काही क्षण
ज्येष्ठ अभिनेते, रुस्तम-ए-हिंद दारा सिंग यांचे निधन
PHOTOS : दारा सिंग यांच्या खाजगी आयुष्यावर एक नजर