आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुन्नीचे 'फॅशन खतम'द्वारे पुनरागमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा खान)

मलायका अरोरा खान 'मुन्नी बदनाम हुई..' नंतर पती अरबाज खानच्याच आगामी 'डॉली की डोली' मध्ये 'फॅशन खतम'या आयटम साँगमध्ये दिसणार आहे. मागील आठवड्यात राजकुमार राव आणि मलायका अरोरा खानवर एक नवीन आयटम साँग चित्रीत करण्यात आले. अरबाज खानच्या 'डॉली की डोली' चित्रपटातील या आयटम साँगचे 'फॅशन खतम' हे बोल आहेत. या गाण्यामध्ये सोनम कपूरचा समावेश आहे. मात्र यात ती डान्स करताना दिसणार नाही.
चित्रपटाबद्दल निर्माता अरबाज खानने सांगितले की, 'मलायकाचा या गाण्यामधील लूक सुंदर आहे. शिवाय चित्रपटात पहिल्यांदाच नाचणार्‍या राजकुमार रावने देखील चांगले काम केले आहे. एका छोट्या शहरातील लग्नसोहळ्यामध्ये या गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. हे गाणे साजीद आणि वाजीदने गायले आहे.'
अरबाजच्या मते, या गाण्याची 'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम हुई..'शी तुलना होईल, पण ही तुलना करण्याचा त्याचा विचार नाही. यावर मलायकाने प्रतिक्रिया देत म्हटले की, 'फॅशन खतम गाणे मुन्नी बदनाम हुई... पेक्षा खूप वेगळे असल्याचे मला वाटते. त्यामुळे या दोन गाण्यांमध्ये तुलना करण्यासारखे काहीच नाही. मला या गाण्यावर डान्स करताना फराहची (मुन्नी...ची नृत्यदिग्दर्शिका) आठवण आली. या चित्रपटाद्वारे मी पहिल्यांदाच रेमो डिसूजासोबत काम करत आहे. गाण्यामधील माझ्या कॉस्ट्यूमचे डिझाइन रिक रॉयने केले आहे. गाण्यात घागरा चोळीमध्ये वेगवेगळ्या आकर्षक रंगांचा वापर केला आहे.'