आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युझिकल परफॉर्मन्सनी बहरला 'कॅपेचिनो' सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. असाच एक विशेष प्रयोग एस. डी. मोशन पिक्चर्सची निर्मिती आणि शिव कदम दिग्दर्शित 'कॅपेचिनो' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या दिमाखात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सिनेसृष्टील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. अविनाश विश्वजीत यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस म्युझिकल परफॉर्मन्सनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शिव कदम आणि विश्वजित यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अविनाश विश्वजित या तरुण जोडीने हटके म्युझिक दिले असून या सिनेमात एकूण चार वेगळ्या फ्लेवर्सच्या गाण्यांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. 'थोडीशी स्वीट स्वीट शुगर….' असे बोल असलेल्या सिनेमाचे टायटल साँग सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. 'तू दर्दे दिल…' हे गीत साहिल कुलकर्णी या नव्या दमाच्या तरुणाने गायले असून या सिनेमाच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून साहिलने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. गायिका आनंदी जोशी आणि फरहाद भिवंडीवाला यांच्या आवाजत सिनेमातील 'कधी कधी गुणगुणावे…' हे रोमॅण्टिक गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे.
'कॅपेचिनो' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत प्रथमच एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. गायिका शिखा अजमेरा हिच्या आवाजात 'अलीफिया अलीफिया' हे एक अरेबिक स्टाईलचे म्युझिक असलेले गीत रेकॉर्ड करण्यात आले असून अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता संजय नार्वेकर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे ही या सिनेमाची विशेष बाब आहे.
या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...