आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हँलो नंदन\' सिनेमाचे शानदार म्युझिक लॉन्च!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक राहुल जाधव दिग्दर्शित, नॉक नॉक एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या 'हॅंलो नंदन' या आगामी सिनेमाचे म्युझिक लॉन्च नुकतेच मुंबई येथे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. या सोहळ्याला नॉक नॉक एन्टरटेन्मेंटचे नवीन रमनानी आणि रीनु ओहलान, सहनिर्माते अभिनव मिश्रा, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री मृणाल ठाकूर, देवेंद्र भगत, अनंत जोग, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, अमितराज, गीतकार गुरु ठाकूर, केदार शार्दुल, लेखक सौरभ भावे व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
म्युझिक लाँच सोहळ्यात सर्वात प्रथम सिनेमातील धमाल टायटल साँग उपस्थिताना ऐकवण्यात आले. त्यानंतर सिनेमातील कलाकार आदिनाथ कोठारे आणि मृणाल ठाकूर या जोडीने एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला आणि उपस्थितांची मने जिंकली. या सिनेमात एकूण पाच गाणी असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, केदार शार्दुल, गुरु ठाकूर आणि रुपेश यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि अमितराज यांनी संगीत दिले आहे.
या सिनेमाचे संगीत खरच खूप छान झाले असून दोघांवरही अतिशय उत्तमपणे चित्रित करण्यात आले आहे. या सिनेमात आदिनाथ आणि मृणालची जोडी खूप चांगली दिसत आहे आणि तुम्हालासुद्धा ही नवीन जोडी आवडेल याची मला खात्री आहे, असे अभिनेता महेश कोठारे म्हणाले. 'हँलो नंदन' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची निवडक छायाचित्रे...