आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Launch Of Marathi Film Manglashtaka Once More

PHOTOS : स्वप्नील-मुक्ताच्या ‘मंगलाष्टक वन्स मोअर’चे थाटात म्युझिक लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तव आयुष्यात सध्या लग्नसराई नसली तरी रुपेरी पडद्यावर मात्र सध्या मौसम लग्नाचा आहे. प्रेक्षकही या लग्नसराईत वराती म्हणून मोठ्या उत्साहाने सामील होत आहेत. आम्ही बोलतोय ते आगामी 'मंगलाष्टक वन्स मोअर' या सिनेमाविषयी. अलीकडेच या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा दिमाखात पार पडला.
निर्माती रेणू देसाई यांच्या ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या सिनेमातून स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे ही लोकप्रिय जोडी बोहल्यावर चढण्यास सज्ज झाली आहे. अवधतू गुप्ते, वैशाली सामंत, अभिजित सावंत, बेला शेंडे, मंगेश बोरगावकर, कीती किल्लेदार या गायकांनी आजचा प्रतिभावान गीतकार गुरु ठाकूर याच्या शब्दांचा आधार घेत स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या विवाहोत्सुक युगुलाला सांगीतिक शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी स्वप्नीलने आपल्या भावी वधूसाठी वामन हरी पेठेंच्या गोरेगाव मधील शोरुममध्ये दागिन्यांची खरेदी केली. त्यामध्ये मंगळसूत्र महत्वाचे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आगामी लग्नाची उत्सुकता आणि एक अनामिक हुरहूर स्पष्ट दिसत असली तरी एकमेकांवरचे प्रेमही अजिबात लपत नव्हते. या दागिने खरेदीनंतर ही वऱ्हाडी मंडळी संगीत सोहळ्याला आली आणि सोहळ्याला खरा रंग चढला. ‘व्हिडीओ पॅलेस’चे नानूभाई जयमसघांनी, कादंबरी कदम हे ही यावेळी उपस्थित होते.
प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेमभावनांना मोरपिसाच्या स्पर्शाचा मखमली अनुभव देणारा आणि नात्यातील वीण घट्ट करणारा, रेणू देसाई निर्मित, समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी राज्यभरात रिलीज होणार आहे.
‘मंगलाष्टक वन्स मोअर’च्या गाण्यांमध्ये आम्ही साधेपणावर भर दिला आहे. त्यामुळेच यातील चारही गाण्यांमध्ये मेलडी आहे. तरुणाईच्या भावभावनांना ही गाणी नक्कीच स्पर्श करतील', अशी आशा निर्मात्या रेणू देसाई यांनी व्यक्त केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...