आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: मनवाच्या \'पोर बाजार\'चे झाले थाटात म्युझिक लाँच, इव्हेंटमध्ये सेलेब्स दिसले सेल्फी मूडमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(म्युझिक लाँच सोहळ्यातील छायाचित्रे)

मनवा नाईक दिग्दर्शित आगामी 'पोर बाजार' या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत थाटार पार पडला. अभिनेते सचिन पिळगावकर आणि महेश मांजरेकर यांनी सिनेमाचे म्युझिक लाँच केले. यावेळी सिनेमातील स्टारकास्टसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या इव्हेंटला हजेरी लावली होती. या सिनेमाच्या माध्यमातून मनवाने मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
कोणकोण होते हजर...
पोर बाजारच्या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये मनवाची आई आणि अभिनेत्री मीना नाईक, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, कादंबरी कदम, दिग्दर्शक संजय जाधव, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिग्दर्शक रवी जाधव, जितेंद्र जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, अवधुत गुप्ते, अमृता खानविलकर, अतुल परचुरे, सोनिया परचुरे यांच्यासह बरीच कलाकार मंडळी सहभागी झाली होती. यावेळी बरेच कलाकार सेल्फी मूडमध्ये दिसले.
काय आहे सिनेमाची स्टोरीलाईन...
‘पोर बाजार’ ही कथा पाच तरूणांची... अजय, मंजिरी, समर, विशाल आणि रागिणी अशी त्यांची नावे... कॉलेजमध्ये शिकणारी ही तरुण गॅंग नेहमीच लेक्चर बंक करून धमाल मस्ती करत असतात. अचानक असेच एकदा लेक्चर बंक करून ते एका घरात शिरतात आणि सुरू होतो एक अ‍ॅडव्हेंचर प्रवास...या धमाल कथानकात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दमदार जोडी सोबतच चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर, स्वारंगी मराठे, सत्या मांजरेकर, सखील परचुरे, धर्मज जोशी आणि मृणाल पंतवैद्य यांच्याही महत्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहे.

महेश मांजरेकर, मनोज जोशी आणि अतुल परचुरे यांच्या मुलांची सिनेसृष्टीत एन्ट्री...
या सिनेमाद्वारे अभिनेते महेश मांजरेकर, मनोज जोशी आणि अतुल परचुरे यांची नवीन पिढी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सत्या मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा असून सखील परचुरे ही अतुल आणि सोनिया परचुरे यांची मुलगी आहे. तर धर्मज जोशी हा मराठी व हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांचा मुलगा आहे.

धमाल स्टारकास्ट आणि धमाल कथानक असलेल्या ‘पोर बाजार’ ची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले आणि मंदार चोलकर यांनी लिहिलेल्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी छायाचित्रण तर अपुर्वा आणि आशिष यांनी संकलन केले आहे. या सिनेमाच्या टायटल साँगसाठी प्रसिद्ध सिनेमटोग्राफर महेश लिमये यांनी छायाचित्रण केले आहे. कोरिओग्राफी उमेश जाधव, सोनिया परचुरे यांची असून मनाली जगताप हिने कॉस्च्युम डिझाईन केलेत. सुमीत पाटील यांनी कला दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पोर बाजार'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...