(म्युझिक लाँच सोहळ्याची छायाचित्रे...)
मूुंबई - प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी 'प्यारवाली लव्हस्टोरी' या सिनेमाचे म्युझिक लाँच सोमवारी मुंबईत मोठ्या दणक्यात करण्यात आले. हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाचे म्युझिक लाँच केले. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती.
लव्ह स्टोरीवर आधारित या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यासाठी खास रेड अँड व्हाइट थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे सिनेमातील कलाकार रेड आणि व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये अवतरले होते.
या म्युझिक लाँचला सिनेमातील कलाकारांसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, संजय जाधव, सचिन पिळगावकर, हर्षदा खानविलकर, उमेश जाधव, उर्मिला कानेटकर-कोठारे, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, उदय टिकेकर यांच्यासह बरेच सेलेब्स या म्युझिक लाँचला पोहोचले होते.
या सिनेमाची कथा व्यक्तिसापेक्ष नसून समाजात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांवर आधारीत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत असून, उर्मिला कोठारे, नागेश भोसले, समीर धर्माधिकारी उपेन्द्र लिमये आणि चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या सिनेमातील गाण्यांना रोहित राऊत, सायली पंकज, बेला शेंडे, अदर्श शिंदे आणि अमृतराज यांचा आवाज असून, गाण्यांचे बोल मंगेश खांगणे, सचिन पाठक आणि गुरु ठाकुर यांचे आहेत.तर संगीत पंकज पाडगणे, अमृतराज आणि समीर सप्तिसकर यांचे आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा संजय जाधव यांची असून, निर्मिती रेखा जोशी, इंदर राज कपूर आणि संजय जाधव यांची आहे, तर सरिता पाटील आणि दीपक राणे हे सह-निर्माता आहेत. पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. यावर्षी 24 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा म्युझिक लाँच सोहळ्याला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...