आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : रवी जाधवांच्या \'टाइमपास\'चे म्युझिक लाँच, रितेश देशमुखसह पोहोचले मराठी स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम या भावनेला प्रत्येकाच्याच आयुष्यात एक वेगळं स्थान असतं आणि ही भावना जर पहिल्या प्रेमाबद्दलची असेल तर तीचं महत्त्व काही औरच... कोवळ्या वयात जेव्हा प्रेमाचा अर्थही नीट उमगलेला नसतो, तेव्हा मनात उमललेली प्रेमाची हळुवार भावना आणि त्याची तरल स्पंदनं काही वेगळीच असतात. बहुदा प्रत्येकानेच हा अनुभव घेतलेला असतो आणि मनाच्या एका कोप-याच त्या आठवणीही जपून ठेवलेल्या असतात. अशाच कोवळ्या पहिल्या प्रेमाची गोष्ट आता बघायला मिळणार आहे रवी जाधव यांच्या आगामी 'टाइमपास' या सिनेमात.
अलीकडेच या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर आणि रितेश देशमुख यांच्या हस्ते सिनेमाचे म्युझिक लाँच झाले. यावेळी केतकी माटेगावकर आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या सुरेल गीतांची जादू उपस्थितांना अनुभवायला मिळाली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सिनेमातील गाण्यांविषयी आणि सोबत बघा म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...