आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा माझे आवडते पर्यटन स्थळ -अक्षय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगच्या निमित्ताने अक्षयने संपूर्ण जगाचा दौरा केला आहे. मात्र, कुटुंबीयांसोबत सुटी साजरी करण्याचा विषय येताच त्याची पहिली पसंत गोवा असते.
अक्षयने गोव्यामध्ये एक पोतरुगीज घर खरेदी केले आहे. त्या ठिकाणी तो सुटी साजरी करण्यास जातो. आगामी दहा महिन्यांत अक्षयचे शेड्यूल व्यग्र राहणार आहे. कारण त्याचा ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी’, ‘इट्स एंटरटेनमेंट’, ‘गब्बर’ आणि ‘बेबी’ ओळीने प्रदर्शित होणार आहेत.
अक्षय म्हणतो की, ‘मी प्रत्येकी तीन महिन्यांमध्ये सात दिवसांची विश्रांती घेतो. या वेळी मी गोव्याला सुटी साजरी करणार आहे.’ गोवा अक्षयला इतका का आवडतो? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणतो की, ‘जगभरात मला आराम मिळणारी गोवा ही एकमेव जागा आहे. सकाळी उशिरा उठणे, चांगले खाणे, स्वच्छ-सुंदर बीचवर पोहत सूर्यास्ताचा आनंद घेणे, हे सर्व फक्त येथेच मिळू शकते.’