आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Life Changed: Abhishek Bachchan On 10 Years Of ‘Dhoom’

PICS: \'धूम\'ने पूर्ण केली 10 वर्षे, या पूर्ण सीरीजमध्ये अभिषेक दिसला पोलिसाच्या भूमिकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सिनेमाच्या एका सीनमध्ये उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन)
मुंबई: 2013मध्ये आमिर खानच्या 'धूम 3' सिनेमाने नवीन विक्रमच रचला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील जून्या सिनेमांचे विक्रम मोडित काढले होते. सिनेमाने भारतात 260 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि जगभरात 530 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. धूम सीरीजची सुरुवात 2004मध्ये झाली होती. या सीरीजचा पहिला सिनेमा 'धूम' होता. 27 ऑगस्ट 2004 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
'धूम' सीरीजचे आतापर्यंत 'धूम 2' आणि 'धूम 3' हे तीन सिनेमे आले आहेत. हे तिन्ही सिनेमे सुपरहिट झाले आहेत. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या तिन्ही सीरीजमध्ये दिसले आहेत.
त्याच्यासह 'धूम'मध्ये जॉन अब्राहम, 'धूम 2'मध्ये हृतिक रोशन आणि 'धूम 3'मध्ये आमिर खान यांनी काम केले आहे. 'धूम'चे 10 वर्षे पूर्ण झाल्याने अभिषेक बच्चनने टि्वट करून सांगितले, “10yrs ago my life changed! #10yrsofDhoom thank u all 4 the constant love and support. @udaychopra @TheJohnAbraham @Esha_Deol @SanjayGadhvi4,”.
'धूम'चे दिग्दर्शन संजय गढवी यांनी केले होते. या सिनेमात अभिषेक बच्चनसह उदय चोप्रा , जॉन अब्राहम, ईशा देओल, रिमी सेनने काम केले होते. सिनेमाचे टायटल साँग 'धूम मचाले' बरेच हिट झाले होते. सिनेमात अभिषेकने पोलिसाची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने इतर दोन सीरीजमध्येसुध्दा पोलिसाचीच भूमिका साकारलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिषेक बच्चनची 'धूम' सीरीजची काही छायाचित्रे...