आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Models And Engineering Student Died In Car Accident

आजी-आजोबांना भेटून नागपुरला परतणा-या या मॉडेलवर काळाची झडप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत निशा शर्मा)
नागपूरः आपल्या आजी-आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करुन छिंदवाड्याहून नागपूरकडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात नागपुरातील अभिनयांत्रिकीला असलेल्या निशा शर्माचा मृत्यू झाला. निशा मॉडेल होती. या दुर्घटनेत निशासोबत जेनिफर शर्मा हिचाही जागीत मृत्यू झाला, तर आणखी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांवर व्होक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. नीलम मिश्रा व हार्दिक हर्लाबा, अदन अफरोज अहमद, अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निशा ही छिंदवाड्यातील उमरानाला येथील रहिवासी होती. तिचे आजोबा डॉ. मातादीन शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी निशा आणि तिचे मित्र छिंदवाड्याला गेले होते. सोमवारी रात्री पाच जण कारने नागपूरकडे निघाले. रिंग रोडवरील लिंगा भागात हार्दिकचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे धावती कार रस्तादुभाजकावर आदळली. यात पाचही जण जखमी झाले. जेनिफरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याच दरम्यान कारही जळाली. जखमींना नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी निशाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अभिनेत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण...
मॉडेलिंग, अँकरिंग व अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःच्या बळावर करिअर करू इच्छ‌िणाऱ्या निशा शर्माचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. नियतीला कदाचित ते मान्य नसावे. इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनच्या तृतीय वर्षाची विद्या‌र्थिनी असेलेली निशा अभ्यासतही हुशार होती. गतवर्षी मिस मिहान स्पर्धेतही ती फर्स्ट रनरअप होती. काही दिवसांपूर्वी तिला मालिकेसाठी ऑफरही आली होती. बॉलिवूड व टेलिव्हिजनच्या दुनियेत तिला अभिनयाचा ठसा उमटवायचा होता.
पुढील स्लाईडमध्ये पाहा किती भीषण होता अपघात आणि निशाची छायाचित्रे...