आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत बहिणीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये थिरकले श्वेता आणि अभिषेक बच्चन, पाहा INSIDE PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नैना आणि कुणाल कपूर यांच्या वेडिंग रिसेप्शनमधील छायाचित्रे)

नवी दिल्ली- शनिवारी म्हणजे 11 एप्रिल रोजी दिल्लीत अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन आणि कुणाल कपूर यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीय दिसले. नैनाचे आई-वडील रमोला आणि अजिताभ यांनी ही रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानच्या इव्हेंट कंपनीला देण्यात आली होती.
कुणाल आणि नैनाचे लग्न 9 फेब्रुवारी रोजी साऊथ आफ्रिकेच्या सेशेल्समध्ये पार पडले. यामध्ये कुटुंबातील काही सदस्यच उपस्थित होते. मॉडेल आणि अभिनेता कुणाल कपूर 'रंग दे बसंती' या सुपरहिट सिनेमांत झळकला आहे. नैना बच्चन एक इन्व्हेस्टर बँकर आहे.
कोणकोण पोहोचले...
अमिताभ बच्चन यांच्या पत्नी, मुलगा आणि सूनेसह बी टाऊनमधील बरीच मंडळी कुणाल आणि नैनाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. हृतिक रोशन या पार्टीत ताल धरला दिसला. प्रियांका गांधी आपल्या पतीसोबत येथे पोहोचल्या होत्या. आपल्या चुलत बहिणीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये श्वेता आणि अभिषेक बच्चन ताल धरताना दिसले.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला कुणाल-नैनाच्या वेडिंग रिसेप्शनची इनसाइड छायाचित्रे दाखवत आहोत. पुढे क्लिक करा आणि पाहा कशी रंगली ही रिसेप्शन पार्टी...