आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naina Bachchan Ties A Knot, Meet Bachchan Family Not So Well Known Members

नैना बच्चनने गुपचुप थाटले लग्न, भेटा बच्चन कुटुंबातील कॅमे-यासमोर न आलेल्या सदस्यांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य)
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चनने बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर सोबत लग्न केले आहे. रविवारी 8 फेबु्रवारी रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. यावेळी दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. हे लग्न सेशेल्सच्या आयलँडवर पार पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नैना आणि कुणालने गेल्यावर्षी गुपचुप साखरपुडा केला आणि यावर्षी लग्नही गुपचुप केले. कुणाल व नैनाने बीच वेडिंग केले.
खरं तर जेव्हाही बच्चन कुटुंबीयांचा उल्लेख होतो, तेव्हा केवळ अमिताभ-जया आणि अभिषेक-श्वेता यांची नावे समोर येतात. याशिवाय बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांना लोक फारसे ओळखत नाहीत. बिग बींची लाडकी नात आराध्या बच्चनविषयी सर्वांना ठाऊक आहे. मात्र बिग बींची इतर नातवंडे किंवा पुतणे-पुतणी नेहमी लाइमलाइटपासून दूर असतात.
बच्चन कुटुंब फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित आणि प्रतिष्ठित घराणे आहे. अमिताभ यांना एक सख्खा भाऊ असून त्यांचे नाव अजिताभ बच्चन आहे. ते आपल्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये स्थायिक झाले होते. मात्र तेजी बच्चन यांच्या निधनानंतर अजिताभ आपल्या कुटुंबासोबत भारतात परतले. अजिताभ यांच्या पत्नीचे नाव रमोला आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि तीन मुली आहे. भीम हे त्यांच्या मुलाचे तर नीलिमा, नम्रता आणि नैना ही मुलींची नावे आहेत.
बिग बींची फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासूनच हे कुटुंब प्रसिद्ध आहे. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन प्रसिद्ध कवी होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा बिग बींच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना...