आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Namrata Shirodkar Birthday Special Family Photos

पतीपेक्षा वयाने मोठी असेलली नम्रता आहे 9 वर्षांच्या मुलाची आई, पाहा Family PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती महेश बाबू, मुलगा गौतम आणि मुलगी सितारासोबत नम्रता शिरोडकर)
43 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. 1993 मध्ये तिने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता. शिवाय मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर राहिली होती. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षे नम्रताने मॉडेलिंग केले आणि नंतर सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला.
पहिला सिनेमा सलमान खानसोबत...
1998 मध्ये नम्रताने सलमान खानसोबत 'जब प्यार किसीसे होता है' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. या सिनेमात तिने छोटेखानी भूमिका साकरली होती. विशेष म्हणजे या सिनेमापूर्वी नम्रताने ‘पूरब की लैला पश्चिम की छैला’ हा सिनेमा साइन केला होता. मात्र आजपर्यंत हा सिनेमा रिलीज झालेला नाही. तिच्या यशस्वी सिनेमांच्या यादीत पुकार, वास्तव, हेरा फेरी, अस्तित्व, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे, LOC कारगिल या सिनेमांचा समावेश आहे.
नम्रतापेक्षा वयापेक्षा लहान आहे तिचा पती...
बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडत असल्याचे बघून नम्रताने लग्न करुन इंडस्ट्रीला रामराम ठोकला. 2005 मध्ये दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूसोबत नम्रताने लग्न केले. 2000 मध्ये 'वामसी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिची भेट महेश बाबूसोबत झाली होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने साडे तीन वर्षे लहान आहे. महेश-नम्रता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा गौतम नऊ वर्षांचा तर मुलगी सितारा अडीच वर्षांची आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नम्रता शिरोडकरची कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...