आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nandesh Umap Received 'Amazing World Record' For Amazing 50 Meter Angarkha (Ghagra) For The Amazing 50th Show Of "Jambhul Akhyan"

50 मीटरचा घागरा परिधान करुन नंदेश उपम यांचे सादरीकरण, 'वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड'मध्ये नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - .'वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड'चे संस्थापक पवन सोळंकी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नंदेश उमप)
दादरच्या शिवाजी मंदीर येथे 'लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर'तर्फे 15 जुलै रोजी 'जांभूळ आख्यान'चा 50 वा प्रयोग सादर करण्यात आला. शाहीर विठ्ठल उमप आणि त्यांच्या पत्नी वत्सलाताई उमप यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या 50 व्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर विठ्ठल उमप आणि त्यांच्या पत्नी वत्सलाताई उमप यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.
यावेळी नंदेश उमप यांनी 50 व्या प्रयोगाच्या निमित्ताने 50 मीटरचा घागरा आणि इतर दागिने परिधान करुन तब्बल अडीच तास हे लोकनाट्य सादर केले. त्यानिमित्ताने नंदेश उमप यांची 'वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस'मध्ये नोंद करण्यात आली आहे. 'लाँगेस्ट म्युझिकल ड्रामा विथ हेवियेस्ट एक्सेसरीज' या शीर्षकाखाली नंदेश उमप यांच्या या उपक्रमाची दखल घेण्यात आली.
शाहीर विठ्ठल उमप 43 मीटरचा घागरा घालून हे प्रयोग सादर करत असतं. नंदेश उमप यांनी मात्र 50 मीटरचा घागरा परिधान करुन हे सादरीकरण केले.'वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड'चे संस्थापक पवन सोळंकी यांच्या हस्ते नंदेश उमप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.