चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज (3 नोव्हेंबर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी, अभिनेते
अमिताभ बच्चन, अनुपम खेर, रितेश देशमुख, पूजा भट्ट, यांच्यासह अनेक मान्यवरांनी
ट्विटरच्या माध्यमातून सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
'या चतुरस्त्र अभिनेत्याच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील. जुन्या आणि नव्या पीढीचे ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे', या भावपूर्ण शब्दांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.