आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच भेटीत नर्गिसच्या प्रेमात पडले होते सुनील, बघा खासगी आयुष्यातील PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या काळातील अनेक कलाकारांच्या अभिनयाचे दाखले दिले जातात. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे नर्गिस. नर्गिस यांनी आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या दमावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नर्गिस आपल्या सिनेमांबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. आज (3 मे) नर्गिस यांची 32 वा पुण्यतिथी आहे.

नर्गिसचे फिल्मी करिअर आणि अफेअर
नर्गिस यांचे राज कपूर यांच्याबरोबर अफेअर होते, असे सांगितले जाते. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री कमालीची होती. पडद्यावर ही जोडी येताच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती. दोघांनी एकत्र सोळा सिनेमांमध्ये काम केले. आवारा, अनहोनी, बेवफा, श्री 420, जागते रहो, हे या जोडीचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत. मात्र त्यांचे नाते फक्त सिनेमांपुरतेच मर्यादित राहिले.
राज कपूर यांच्यानंतर सुनील दत्त यांची एन्ट्री नर्गिस यांच्या आयुष्यात झाली. नर्गिस यांनी सुनील दत्त यांची निवड जोडीदाराच्या रुपात केली.
नर्गिस आणि सुनील दत्त यांची पहिली भेट बलराज साहनी यांच्या 'दो बीघा जमीन' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी सुनील दत्त एक स्ट्रगलिंग अभिनेते होते, तर नर्गिस आघाडीच्या अभिनेत्री होत्या. तेव्हा भविष्यात नर्गिस आपली जोडीदार बनेल, असा विचारही सुनील दत्त यांनी केला नव्हता. मात्र पहिल्याच भेटीत सुनील दत्त नर्गिसच्या प्रेमात पडले होते.
नर्गिस त्यावेळी मरीन ड्राईव्ह भागात राहात होत्या. सुनील दत्त नर्गिसचे चाहते होते. कॉलेजला जाण्यापूर्वी ते नर्गिसची पांढरी कार जाण्याची वाट बघायचे. नर्गिस सुनील दत्तच्या प्रेमाविषयी अनभिज्ञ असल्यामुळे त्यांचे लक्ष कधी सुनील यांच्याकडे गेले नाही. दोघांचा मेळ जमणे अशक्य होते. मात्र जोड्या स्वर्गात बनतात, हेच खरे.
एका मुलाखतीत सुनील दत्त यांनी सांगितले होते की, त्यांनी जेव्हा नर्गिसबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमक्या मिळू लागल्या होत्या. याचे कारण कदाचित नर्गिस मुस्लीम कुटुंबातील असणे हे असावे. या दोघांचे लग्न फार काळ टिकणार नाही, असेही त्याकाळी बोलले गेले होते. मात्र सुदैवाने तसे काही घडले नाही.
दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. त्यांच्या संसारवेलीवर तीन फुलंही उमलली. मात्र कॅन्सरमुळे नर्गिस आणि सुनील दत्तची यांची साथ सुटली. 3 मे 1981 रोजी नर्गिस यांचे मुंबईत निधन झाले.

एक नजर टाकुया नर्गिस यांच्या लव्ह लाईफवर...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा त्यांच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे...