आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्गिसला मिळाला सलमानचा सपोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’द्वारे नर्गिस फखरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अक्षयचा ‘शौकीन’ अचानकपणे सोडल्यानंतर नर्गिसला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अक्षयने तर यापुढे नर्गिससोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ती हॉलीवूडचा एक कॉमेडी सिनेमा करत आहे. मात्र, बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिला कोणाचाच आधार नसल्यासारखा होता.
आता मात्र सलमानने नर्गिसला पाठिंबा देत आपल्या ‘किक’मधील एका गाण्यात संधी दिली आहे. हनी सिंहच्या या गाण्यावर नर्गिस आयटम साँग करणार आहे. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सध्या या गाण्याचा सराव चालू आहे. अंतिम सरावानंतर सलमान हे गाणे पाहणार आहे. त्यानंतर आवश्यक तो बदल करून गाण्याचे शूटिंग करण्यात येईल.