आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nargis Fakhri Rejects Uday Chopra's Marriage Proposal

उदय चोप्राचा लग्नाचा प्रस्ताव नर्गिसने नाकारला, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐकिवात आहे, की नर्गिस फाखरीने उदय चोप्राचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला आहे. सुत्राच्या सांगण्यानुसार, 'उदय या नात्याविषयी खूप गंभीर होता. परंतु नर्गिसने या नात्याला कधीच गंभीररित्या घेतले नाही. तो लग्न करून स्थायिक होण्याच्या विचारात होता पण तिला आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत करायचे असल्याने तिने नकार दिला. म्हणून पुढील दोन-तीन वर्षांपर्यंत लग्न करण्याची त्यांची कोणतीही योजना नाहीये.'
नर्गिसने अलीकडेच हॉलिवूड दिग्दर्शित पॉल फीगच्या 'स्पाय' सिनेमाची शुटिंग केली. तिला वाटते, की तिचे वय अद्याप लग्ना करण्याइतके झालेले नाही. उदयला तिचा हा निर्णय कदापि आवडलेला नाही. परंतु त्याने तिच्या निर्णयाचा सन्मान केला आहे.
याविषयी नर्गिसचा प्रवक्ता सांगतो, 'लग्नाविषयी कोणतीही बातचीत झालेली नाहीये. ती जेव्हा याविषयी निर्णय घेईल तेव्हा सर्वांना सांगेल.'
नर्गिसने जरी उदयचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला असला तरी या जोडीला एकत्र वेळ घालवायला आवडते. दोघांना सार्वजनिक ठिकाणी अनेकदा सोबत बघितल्या गेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा उदय-नर्गिसचे काही PICS...