आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naseeruddin Shah, Dimple Kapadia, Pankaj Kapur New Look In Song 'Shake Your Bootiya'

Video & Pics: गाण्यात स्वतःचा Funny Look पाहून अचंबित झाले हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून डिंपल कपाडिया, दीपिका पदुकोण, पंकज कपूर, अर्जुन कपूर आणि नसीरुद्दीन शाह)
मुंबई - अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइंडिंग फॅनी' या आगामी सिनेमातील 'शेक योर बूटिया...' हे गाणे अलीकडेच रिलीज करण्यात आले आहे. सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर या गाण्यात दिसत आहेत.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हटके पद्धतीने हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात सर्वच स्टार्सचा फनी अंदाज पाहायला मिळतोय. या लूकमध्ये या स्टार्सचा चेहरा मोठा आणि शरीर बारीक दाखवण्यात आले आहे. गाण्याच्या सुरुवातीला दीपिका पदुकोण एक वुडन होम खेळताना दिसते. त्यामध्ये सहा खोल्या आहेत. यापैकी पाच खोल्यांमध्ये सर्वजण हजर असून डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्ससुद्धा फनी आहे.
हा फनी डान्स पाहून सर्व स्टार्स लाजताना आणि अचंबित होताना दिसत आहेत. होमी अदजानिया दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या स्टार्सच्या फनी लूकची छायाचित्रे आणि गाण्याचा व्हिडिओ...