आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Film Awards News In Marathi, Ahirani Language, Upendra Limaye,Divya Marathi

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणा-या अहिराणी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुह्या धर्म कोंचा? चित्रपटातील दृश्य. - Divya Marathi
तुह्या धर्म कोंचा? चित्रपटातील दृश्य.

नंदुरबार - सतीश मनवर दिग्दर्शित तुह्या धर्म कोंचा? या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या या चित्रपटाची भाषा अहिराणी आहे. या चित्रपटातील 90 टक्के चित्रीकरण हे नंदुरबार जिल्ह्यात झाले आहे. तसेच चित्रपटात स्थानिक आदिवासींनीही भूमिका केल्या आहेत.


तुह्या धर्म कोंचा? या चित्रपटाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांची व्यथा दिग्दर्शक सतीश मनवर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नंदुरबार तालुक्यातील आर्डितारा, इसाईनगर व जवळच असलेल्या गुजरात राज्यातील अहवा येथे करण्यात आले आहे.


चित्रपटातील ‘खरा खुरा’ या गाण्यासाठी बेला शेंडे यांना पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. दीड वर्षापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. सुहास पळशीकर यांचीही भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धर्मांतर या विषयालाही थोडा स्पर्श करण्यात आला असून नक्षलवाद व आदिवासींच्या समस्यांवर थेट हात घालून प्रेक्षकांना बोलका करणारा हा चित्रपट खान्देशासह महाराष्ट्रातील लोकांना आवडेल असाच आहे.


तुह्या धर्म कोंचा? चित्रपटात
आम्ही स्थानिक रहिवाशांकडून चांगले काम करवून घेतले आहे.आदिवासी पारंपरिक लोकनृत्य चित्रित केले. त्यामुळे या भागातील आदिवासी संस्कृती चित्रपटाच्या माध्यमातून देशभर पोहोचली आहे. -सतीश मनवर, दिग्दर्शक