आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क दहा ललना म्हणतायेत 'नवरा माझा भवरा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटांमध्ये सध्या नवनवे प्रयोग केले जाताहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग आगामी 'नवरा माझा भवरा' या मराठी चित्रपटात करण्यात आला आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल दहा मराठी तारका एकाच गाण्यात आपल्याला थिरकतांना दिसणार आहेत. लवकरच हे धमाल गाणं तुम्ही पाहणार आहात 'नवरा माझा भवरा' या सिनेमात.निलेश साबळेसोबत १० ललना थिरकणार आहेत. या गाण्यात निलेश साबळेसह गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, सोनाली खरे, शर्मिष्ठा राऊत, मेघा घाडगे, सोनाली खरे, शर्मिला शिंदे, आदिती सारंगधर, पूजा सावंत या दहा हॉट नायिका ताल धरणार आहेत.
१० हॉट नायिका जणू काही अप्सराच त्याही एकाच गाण्यात. एकाच अभिनेत्यासोबत थिरकणार. आहे की नाही एन्टरटेन्मेंटची भन्नाट ट्रीट. तुम्हांला हा नजारा पाहायला मिळणार आहे ‘नवरा माझा भवरा’ या सिनेमात.'बाई बाई किती ग लाजाळू...' या गाण्यात निलेश साबळे आणि त्याच्यासोबत १० मराठी तारका ताल धरणार आहेत. हे भन्नाट गाण्याची कोरिओग्राफर आहे दिपाली विचारे. १० नायिकांसोबत एकाच गाण्याची कोरिओग्राफी करण्याचं आव्हान तिने स्विकारलं आहे. या सर्वांसोबत एकट्या निलेशने डान्स केलाय त्यामुळे तो भन्नाट खूश आहे.
एकंदरीतच दहा ललनात एकटा कन्हैय्या ठरलेल्या निलेश साबळेचे हे धमाल गाणे प्रेक्षक एन्जॉय करतील अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.