अनुराग कश्यपच्या निर्मिती कंपनीमध्ये एक वर्षापूर्वीच हा चित्रपट तयार झाला होता. मात्र, काही कारणांमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. यादरम्यान चित्रपटाची प्रिंट अधिक दर्जेदार करण्यासाठी या प्रिंटवर काम चालू होते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्लोक शर्माने केले आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी, श्वेता त्रिपाठी आणि काही बाल कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'हरामखोर'ची कथा अवघ्या तीन दिवसांत लिहिण्यात आली होती, तर शूटिंग 16 दिवसांत पूर्ण झाले होते.