आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:शाळेच्या मागच्या गेटमधून मॉलमध्ये पळून जायची ही अभिनेत्री, जाणून घ्या ही आहे तरी कोण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री नीरु बाजवा)
बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमांची अभिनेत्री नीरु बाजवा आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 ऑगस्ट 1980 रोजी कॅनडात नीरुचा जन्म झाला. तिने आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये काही निवडक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 'मैं सोलह बरस की', 'प्रिंस', 'फूंक 2', 'मिले ना मिले हम' आणि 'स्पेशल 26' हे तिचे निवडक हिंदी सिनेमे आहेत. तर डझनहून अधिक
पंजाबी सिनेमांमध्येसुद्धा ती झळकली आहे.
बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात...
नीरुने 1998 मध्ये देवानंद यांच्या 'मैं सोलह बरस की' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर पाच वर्षांनी तिने 'असा नु मान वतना दा' या पंजाबी सिनेमाद्वारे पॉलिवूड इंडस्ट्रीत (पंजाबी सिनेसृष्टी) पदार्पण केले. हा सिनेमा बराच गाजला. या सिनेमानंतर तिला ब-याच पंजाबी सिनेमांची ऑफर मिळाली. पाच पंजाबी सिनेमे केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. काही दिवसांपूर्वीच ती विवेक ओबरॉयसह 'प्रिन्स' या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा ठिकठाक चालला. त्यानंतर तिला 'फूंक 2' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. नीरुने 2013 मध्ये 'मिर्ची' या तेलगू सिनेमात कॅमिओ केला होता. सिनेमांसह छोट्या पडद्यावरसुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'हरी मिर्ची लाल मिर्ची', 'अस्तित्वः एक प्रेम कहानी', 'जीत', 'गन्स अँड रोजेज', 'नच बलिए 2' या शोमध्ये तिने काम केले आहे.
शाळेत होती मस्तीखोर...
शालेय जीवनात नीरु बरीच मस्ती करायची. शाळेच्या मागच्या गेटमधून ती मॉलमध्ये पळून जायची. तिथे ती आपला बराच वेळ घालवायची. तिची आई तिला शाळेच्या एन्ट्री गेटपर्यंत सोडायची, मात्र ती मागील गेटमधून बाहेर निघून जायची. एकेदिवशी तिची ही गोष्ट तिच्या आईला कळली. त्यासाठी तिला आईवडिलांचा बरीच बोलणी ऐकावी लागली होती.
लग्न आणि घटस्फोट...
नीरु टीव्ही अभिनेता अमित साधसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. हे दोघे आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
ट्रेडिशनल आणि वेस्टर्न कल्चर आहे पसंत..
नीरुने ट्रेडिशनल आणि वेस्टर्न कल्चर पसंत आहे. तिच्या छायाचित्रांवरुन हे तुमच्या लक्षात येईल. सलवार सूट, साडी, जीन्स, टी-शर्ट, शॉर्ट्स हे सर्व प्रकारचे परिधान तिला पसंत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नीरु बाजवाची निवडक छायाचित्रे...