आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 56 वर्षांच्या झाल्या नीतू सिंह, पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतची 20 छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री नीसू सिंह यांचे बालपणीचे आणि 2014चे छायाचित्र
नीतू यांनी 60च्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बालकलाकाराच्या रुपात अभिनयाला सुरूवात केले. नीतू यांच्या आणखी दोन ओळख आहेत. एक म्हणजे, ऋषी कपूर यांची पत्नी आणि दुसरी रॉकस्टार रणबीर कपूरची आई. नीतू आज त्यांचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी सिनेमांमध्ये एक अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणा-या नीतू यांचा जन्म 8 जुलै 1958 रोजी झाला.
1972मध्ये 'रिक्शावाला' सिनेमामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. 'यादो की बारात' सिनेमामधून त्यांना खरी ओळख मिळाली. 1975मध्ये पहिल्यांदा त्यांचा ऋषी कपूर यांच्यासह 'खेल खेल में' हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला. नीतू यांनी आपल्या काळात ऋषी कपूर यांच्यासह 11 सिनेमे केले. ऋषीसह काम करतात करता नीतू सिंह त्यांच्या प्रेमात पडल्या आणि 1979मध्ये दोघांनी लग्न केले.
लग्नानंतर नीतू सिंहने केवळ ऋषी कपूर यांच्यासह काम केले, त्यामध्ये 'अमर अकबर अँथनी', 'दुसरा आदमी', 'कभी कभी', 'झूठा कही का', 'दुनिया मेरी जेब मे', 'द बर्निंग ट्रेन', 'राजमहल', 'तिसरी आँख' हे सिनेमे सामील आहेत. 2010मध्ये दोघांनी 'दो दूनी चार', 2012मध्ये 'जब तक है जान', आणि 2013मध्ये मुलगा रणबीरसह 'बेशरम'मध्ये काम केले.
नीतू सिंह यांच्या वाढदिवासानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची काही छायाचित्रे दाखवणार आहोत, पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा...