आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहाने मित्रांसह साजरी केली बर्थडे पार्टी, छायाचित्रे केली शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बर्थडे पार्टीत केक कापताना अभिनेत्री नेहा धुपिया)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने आपल्या वाढदिवसाची छायाचित्रे स्वतःच्या फेबसुक अकाऊंटवर शेअर केली आहेत. बुधवारी (27 ऑगस्ट) नेहाने आपला 34वा वाढदिवस मित्रमैत्रिणींसह साजरा केला.
नेहाने वाढदिवसाची जी छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यामध्ये ती केक कापताना दिसत आहे. या खासगी पार्टीत नेहा ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. ती अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. तिने या इव्हेंटमध्ये रॅम्पवॉकसुद्धा केला होता.
नेहाने 'मिन्नाराम' या मल्याळम सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. तर 'कयामत' हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. नेहा यावर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होणा-या 'उंगली' सिनेमात मोठ्या पडद्यावर ब-याच दिवसांनी दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नेहाच्या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे...