आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तने तुरुंगातून लिहिले हिरानींना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार हिरानी सध्या आपल्या ‘पीके’च्या एडिटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळेच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम अथवा पार्ट्यांना हजेरी लावलेली दिसत नाही. बाहेरच्या जगाशी नाते तोडत स्वत:ला आपल्या घरातील एका रूममध्ये कैद करून ते दिवस-रात्र ‘पीके’च्या एडिटिंगवर काम करत आहेत. ‘पीके’च्या लाँच करण्यात आलेल्या पोस्टरमुळे या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे राजकुमार हिरानींवर दर्जेदार सिनेमा बनवण्याचे दडपण वाढले आहे. या बिझी शेड्यूलमध्ये मात्र त्यांनी संजय दत्तशी पत्राद्वारे संपर्क ठेवला आहे. नुकतेच संजय दत्तने लिहिलेले एक पत्र हिरानींना मिळाले असून ते वाचून हिरानी भावुक झाले आहेत.
या पत्रामध्ये संजय दत्तने ‘पीके’मधील आमिर खानच्या पोस्टर्सचा उल्लेख केला आहे. सिनेमाचे पोस्टर अद्याप पाहिले नसल्याचे संजयने पत्रात म्हटले आहे. तुरुंगात आलेल्या नवीन कैद्यांकडून मला या पोस्टरबद्दल कळाले असल्याचे संजयने सांगितले आहे. तुरुंगात या पोस्टरची प्रशंसा केली जात असून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रथम हे पोस्टर पाहण्याची इच्छा संजयने व्यक्त केली आहे.