आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Comer Actors In Bollywood With Leading Actresses

सोनम, प्रियांका, राणी या अभिनेत्री नवोदितांसह करणार ऑनस्क्रिन रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('खुबसुरत' सिनेमाच्या पोस्टरवर फवाद खान आणि सोनम कपूर)
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक नवोदित स्टार्सची एंट्री होत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्यांपैकी काहीजण बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींसह अभिनय करताना दिसणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता आहे.
फवाद अभिनेत्री सोनम कपूरसह 'खुबसुरत'मध्ये दिसणार आहे. 33 वर्षांचा फवाद पाकिस्तानी अभिनेता असून, मॉडेल आणि गायक आहे. त्याचा जन्म लाहोरमध्ये झाला. परंतु त्याचे बालपण ग्रीस, साउदी अबर आणि ब्रिटनमध्ये गेले.
12 वर्षांचा असताना तो पाकिस्तानमध्ये परतला होता. तिथे त्याने जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. फवाद आतापर्यंत अनेक टीव्ही आणि मालिकांमध्ये काम केले. तो एक गायकदेखील आहे.
सोनमशिवाय प्रियांका चोप्रा, बिपाशा बसु, अनुष्का शर्मासारख्या अभिनेत्रीसुध्दा त्यांच्या आगामी सिनेमांमध्ये नवोदित अभिनेत्यांसह काम करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कोणत्या नवोदित अभिनेत्यांसह बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री करणार रोमान्स...