प्रिती झिंटा
दिवसेंदिवस प्रितीसोबत होणारे वाद वाढतच चालले आहेत. आजकाल प्रिती लॉस एंजिलिसध्ये सुटी घालवत आहे. सुटीवर जाण्याआधी प्रितीने आपला एक्स-बॉयफ्रेंड नेस वाडिया याच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता, ज्यामुळे ती सतत हेडलाईन्स मध्ये दिसत होती. आता हे नवीन प्रकरण तिच्या साखरपुड्याशी संबंधित आहे. प्रितीने लॉस एंजिलिस येथे स्थित एका कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्हशी साखरपुडा केल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये रंगत आहेत.
इंडस्ट्रीतील एका सूत्रानुसार, प्रिती मागच्या आठ महिन्यांपासुन लॉस एंजिलिस स्थित जिन याला डेट करत आहे. इतकंच नाही तर प्रितीने आपल्या या नवीन बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला आहे. सूत्रांचे तर असेही म्हणणे आहे की या आयपीएलच्या वेळी प्रितीच्या हातात साखरपुड्याची अंगठीसूद्धा दिसली होती. प्रिती आपला सध्याचा बॉयफ्रेंड जिनसोबत एक मिडिया हाउस सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यांची या विषयावर चर्चादेखील सुरू झाली आहे. मुंबईला परत आल्यानंतर प्रिती याबद्दल औपचारिक घोषणा करू शकते असा अंदाज बांधला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयपीएल सामन्यादरम्यान प्रितीच्या हातातील अंगठी...ही छायाचित्रे समोर आल्यानंतर प्रितीच्या साखरपुड्यांच्या चर्चांना उधाण आले होते...