आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Friendship Relations Between Bollywood Actress

आलिया आणि श्रद्धामध्ये वाढतेय मैत्री, या अॅक्ट्रेससुद्धा आहेत बी टाऊनमधील बेस्ट BFF's

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करण जोहरच्या पार्टीत क्लिक करण्यात आलेले आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरचे छायाचित्र)
बॉलिवूडमध्ये सध्या दोन अभिनेत्रींमध्ये चांगली मैत्री झाली आहे. आम्ही बोलतोय ते आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर या बी टाऊनमधील नवोदित अभिनेत्रींविषयी. अलीकडेच रिलीज झालेल्या या दोघींच्याही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. यानिमित्ताने या दोघींनीही एकमेकींना शुभेच्छा दिल्या आहेत.
'एक व्हिलन' या सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल आलियाने श्रद्धाला फोनवरुन शुभेच्छा दिल्या. तर आता श्रद्धासुद्धा आलियाच्या रिलीज झालेल्या 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' या सिनेमाचे गोडवे गात आहे. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने ट्विटरवर ट्विट केले, "सॅटर्डे सॅटर्डे या गाण्यात आलिया कमाल दिसत आहे."
पाहा श्रद्धाचे ट्विट -
Shraddha Kapoor @ShraddhaKapoor
Follow
@aliaa08 had a blast breaking it down to #saturdaysaturday with you ❤️
10:59 AM - 17 Jul 2014
तसे पाहता बी टाऊनमधून अभिनेत्रींमध्ये मैत्रीपेक्षा त्यांच्यातील शत्रुत्वाच्या बातम्या जास्त कानावर पडत असतात. कॅट फाइटशिवाय इंडस्ट्रीत मिर्च मसालाच शिल्लक उरणार नाही. मात्र आता नवीन पिढीतील अभिनेत्री जास्त प्रोफेशनल झाल्या आहेत. त्या आपल्या फिल्मी करिअरसोबतच इंडस्ट्रीत मैत्रीसुद्धा निभावत आहेत.
पुढे वाचा इंडस्ट्रीतील अशाच मैत्रीविषयी...