आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Marathi Film : Dilip Prabhavalkar Once Again In Main Role

नवा मराठी चित्रपट : दिलीप प्रभावळकर पुन्हा मुख्य भूमिकेत झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘झपाटलेला’मधील तात्या विंचू असो किंवा ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेतील आजोबा, आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनातच नाही तर घरातही स्थान मिळवणारे सामान्यांतील असामान्य कलाकार दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा ‘शज्जनो बानो’ या मनोज मित्रा लिखित बंगाली लोककथेवर ‘नारबाची वाडी’ या चित्रपटात नारबाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


दूरदर्शनवरील गाजलेला चिमणराव ते ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील महात्मा गांधी असा अभिनयाचा प्रवास साकारलेल्या प्रभावळकर यांनी ‘झिंक चिक झिंक’ आणि ‘मसाला’ या दोन मराठी चित्रपटांत छोट्या भूमिका केल्या होत्या. मात्र, ब-याच वर्षांनी ‘नारबाची वाडी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ते दिसणार असल्याने मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली आहे. एका इरसाल म्हाता-याच्या भूमिकेतील प्रभावळकर आणि मनोज जोशी ही जोडगोळी विनोदी धम्माल उडवणार आहेत. मात्र, त्याचबरोबर निखिल रत्नपारखी, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, भाऊ कदम, कमलाकर सातपुते असे अस्सल कलाकारही चित्रपटात चमकणार आहेत.


या चित्रपटासाठी पद्यरचना गुरू ठाकूर यांची असून आदित्य सरपोतदार यांचे दिग्दर्शन आहे. कोकणातील निसर्गरम्यता आणि धम्माल विनोदी कलाकार या मिश्रणातून एक चांगला विनोदीपट लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.