आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ता बर्वे म्हणतेय, 'लग्न पहावे करुन'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लग्न पहावे करुन...' अहो हे आम्ही नाही तर अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणतेय. मुक्ताबरोबरच तिच्या आणखीन तीन मित्रांचेही हेच म्हणणे आहे. मुक्ताचे हे तिघे मित्र म्हणजे तेजश्री प्रधान, उमेश कामत आणि सिद्धार्थ चांदेकर. अहो 'लग्न पहावे करुन' असे म्हणत हे चौघे लवकरच मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला येत आहे.

अजय नाईक दिग्दर्शित 'लग्न पहावे करुन' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा आहे. त्याच्या शीर्षकावरुनच हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

अदिती टिळक (मुक्ता बर्वे) आणि निशांत बर्वे (उमेश कामत) एक मॅरेज ब्युरो सुरु करतात. त्यांच्या मॅरेज ब्युरोचे नाव 'शुभविवाह' आहे. लव्ह मॅरेज नव्हे तर अरेंज मॅरेज जुळवून ते लग्न शेवटपर्यंत कसे टिकेल यावर त्यांचा भर असतो. यासाठी हे दोघेही 'सायंटिफिक मॅरेज मेकिंग' ही नवीन संकल्पना अमलात आणतात. पत्रिका बघून लग्न जुळवण्याचे ते ठरवतात. अदिती आणि निशांतच्या मॅरेज ब्युरोत जुळलेले पहिले लग्न म्हणजे राहुल आणि नंदिनीचे. मात्र राहुल आणि नंदिनीचे लग्न फार काळ टिकणार नाही, असे शहरातील एक प्रसिद्ध ज्योतिषी अदिती आणि निशांतला सांगतात. त्यामुळे राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकवण्याचे मोठे चॅलेंज राहुल आणि अदितीसमोर उभे राहते. आता राहुल आणि नंदिनीचे लग्न टिकणार का ? अदिती आणि निशांत त्यांच्या उद्देश पूर्ण करु शकतील का ? हे या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.

अलीकडेच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून लवकरच हलके-फुलके कथानक असलेल्या सिनेमाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....