आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांच्या भेटीला येतोय \'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा\', मकरंद-सयाजीची रंगणार जुगलबंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय विडंबनावर भाष्य करणारा मराठी सिनेमा म्हटला, की 'सिंहासन' आणि 'सामना' या दोन सिनेमांची आठवण मराठी सिनरसिकांना व्हायची. मधल्या काळात राजकारणावर भाष्य करण्याचं विनोद हे सर्वात उत्तम साधन आहे, हे लक्षात आल्यानंतर 2009मध्ये रुपेरी पडद्यावर 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा राजकीय व्यंगावर भाष्य करणारा धमाकेदार सिनेमा आला. तिकिट बारीवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आता तितक्याच जोमाने आणि तयारीनिशी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही भावेल, अशा वास्तवदर्शी कथानकावर 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा सिनेमा असणार आहे.
कसा असेल 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा', जाणून घेण्यासाठी आणि सिनेमाच्या मुहूर्ताची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...