आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW PHOTO: एकसारख्या हेअरस्टाइलमध्ये दिसला SRK आणि त्याचा मुलगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम, सोबत खासदार राजीव शुक्ला)
मुंबईः सुपरस्टार शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामचे एक नवीन छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रात अबराम त्याचे वडील शाहरुखसोबत दिसतोय. त्यांच्यासोबत खासदार राजीव शुक्लासुद्धा दिसत आहेत. राजीव यांनी शाहरुखसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शाहरुख आणि अबरामसोबतचे त्यांचे हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. या छायाचित्रात शाहरुख आणि अबरामची एकसारखी हेअरस्टाइल दिसत आहे.
अबराम हा शाहरुखचा सर्वात धाकटा मुलगा असून 27 मे 2013 रोजी त्याचा जन्म झाला. शाहरुखने त्याची पहिली झलक ईद (6 ऑक्टोबर)च्या निमित्ताने दाखवली होती. शाहरुखने आपल्या ट्विटर अकाउंटवर अबरामसोबतचे हे छायाचित्र शेअर केले होते. त्यानंतर हॅपी न्यू इयर या सिनेमात अबराम झळकला होता. तो आपल्या वडिलांसोबत खेळताना दिसला होता. शिवाय सांताक्लॉजच्या गेटअपमधीलही त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर आले होते.
पुढील स्लाईड्सवर पाहा आत्तापर्यंत समोर आलेली अबरामची छायाचित्रे...