आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Poster Of Upcoming Bollywood Film 'Hawaizaada'

'हवाईजादा'च्या नवीन पोस्टरवर रोमान्स करताना दिसतायेत आयुष्मान आणि पल्लवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हवाईजादा'च्या दूस-या पोस्टरवर पल्लवी शारदा आणि आयुष्मान खुराना)
मुंबईः आगामी 'हवाईजादा' या सिनेमाचे नवीन पोस्टर अलीकडेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर सिनेमातील मुख्य अभिनेता आयुष्मान खुराना अभिनेत्री पल्लवी शारदासोबत रोमान्स करताना दिसतोय. आयुष्मान या पोस्टरवर गीकी अवतारात दिसतोय, तर पल्लवीचा मराठमोळा लूक दिसतोय. या सिनेमाचे यापूर्वी दोन पोस्टर आणि ट्रेलर लाँच करण्यात आले होते.
हा सिनेमात भारतातील महान शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शिवकर बापूजी तळपदे यांनी पहिल्या विमानाची निर्मिती केली होती. या सिनेमात आयुष्मानने शिवकर यांची भूमिका साकारली आहे.
विभू पुरी दिग्दर्शित हा सिनेमा विशाल गुरनानी आणि राजेश बंगा यांनी रिलायन्स एन्टरटेन्मेंटसोबत मिळून निर्मिती केली आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि पल्लवी शारदासोबत मिथून चक्रवर्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या 30 जानेवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाचे अन्य पोस्टर्स...