आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Song Of Honey Singh \'Desi Kalakar\' Released

सोनाक्षी बनली हनी सिंगची \'गर्लफ्रेंड\', PICS आणि VIDEOमध्ये पाहा \'देसी कलाकार\'चा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('देसी कलाकार' अल्बमच्या एका सीनमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हनी सिंग)
मुंबई: यो यो हनी सिंगचा नवीन म्यूझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हनी सिंगची गर्लफ्रेंच्या रुपात दिसणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले, की देसी कलाकार (हनी सिंग) म्यूझिक कंपोझ करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे लक्ष लागत नाही. तो गर्लफ्रेंड सोनाक्षी सिन्हाला फोन करून विचारतो तिच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला की नाही?
ती त्याला पंजाबी भाषेत नाही म्हणते. दुस-या दिवशी दोघे पळून जातात. मात्र म्यूझिकच्या शेवटी दोघांना पोलिस पकडतात. हनीची गर्लफ्रेंड तिच्या वडिलांसोबत घरी जाते. त्यानंतर पोलिस हनीला विचारतात किती दिवस सुपरस्टार राहशील, तो म्हणतो, 'हमेशा'
गुलशन ग्रोवर यांनी या व्हिडिओमध्ये सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि हनी या व्हिडिओमुळे चर्चेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा देसी कलाकारांची छायाचित्रात एक झलक...सोबतच पाहा या म्यूझिकचा व्हिडिओ...