आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इफ्फीमध्ये -हीदम, म्युझिक अँड मेलडीचा रंगणार अनोखा मेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गोव्यात होणा-या केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे ऱ्हिदम, म्युझिक अँड मेलडी हे विशेष प्रदर्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या विशेष प्रदर्शनातून जगभरातील चित्रपटरसिकांना भारतीय अभिजात संगीताचे भारतीय चित्रपटांमधील योगदान समजून घेता येणार आहे.

गोवा हे केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायमस्वरूपी केंद्र बनल्यानंतर, जगभरातील चित्रपट रसिकांना भारतीय अभिजात चित्रपटांच्या विविध वैशिष्ट्यांची ओळख करून देणारे प्रदर्शन भरवण्याचे काम केंद्र सरकारचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) करते. आजवर विविध प्रकारची मूळ पोस्टर्स एनएफएआयने इफ्फीमध्ये प्रदर्शित केली आहेत. यावर्षी मात्र भारतीय चित्रपटांमधील अभिजात रागसंगीताचे दर्शन घडवण्याचे काम
एनएफएआयचे प्रदर्शन करणार आहे, अशी माहिती संस्थेच्या प्रदर्शन समन्वयक आरती कारखानीस यांनी दिली.

प्रदर्शनाचे वेगळेपण
भारतीय चित्रपट बोलू लागला तेव्हाच तो गाऊही लागला होता. आलमआरा या पहिल्या भारतीय बोलपटात अनेक गाणी होती. संगीताची ही परंपरा विविध संगीतकारांनी सातत्याने समृद्ध केली. संगीतमय चित्रपटांचे एक युग भारतीय चित्रपटांमध्ये अवतरले. या संगीतमय युगाची झलक ऱ्हिदम, म्युझिक आणि मेलडी या प्रदर्शनातून दाखवण्याचा प्रयत्न आहे.
एकूण संगीतमय चित्रपटांची सुमारे १३० दुर्मिळ पोस्टर्स
त्यातील ९० हून अधिक पोस्टर्स रागसंगीताची निदर्शक
ईशान्येकडील राज्यांमधील चित्रपटांची ३० पोस्टर्स
रागांवर आधारित चित्रपटगीतांची विशेष माहिती
कृष्णधवल काळापासून ते नव्या, लेटेस्ट चित्रपटगीतांपर्यंतची माहिती
एनएफएआयच्या खजिन्यातील सुमारे २५ चित्रपटांचा इफ्फीत समावेश
ईशान्येचे निराळे दालन
ईशान्येकडील सात राज्यांतील संगीतमय चित्रपटांचे वेगळे ३० पोस्टर्सचे दालन इफ्फीमध्ये समाविष्ट केले आहे. मणिपुरी, आसामी, बिहारी, खासी आदी भाषांतील चित्रपटसंगीताची माहिती त्यात असेल. तसेच हिंदीच्या जोडीने प्रादेशिक भाषांतील चित्रपटसंगीताचाही समावेश प्रदर्शनात आहे.