आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना करतेय फॅशनकडे वळण्याचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत फॅशन आयकॉन ठरलेली करीना कपूर खान भविष्यात आपला वेंचर देखील आणू शकते. तिने स्व:त याबाबत दुजोरा दिला आहे. करीनाने सांगितले की, सध्या तिच्या डोक्यात याबाबतचा काही विचार नाही. मात्र येणार्‍या काळात ती असे करू शकते. यामध्ये तिची बहीण करिश्मा कपूरदेखील भागीदार होऊ शकते.
करीनाने आपल्या बहिणीची या वेळी स्तुतीदेखील केली. तिने सांगितले की, ‘ती दोन मुलांची आई असूनदेखील आजही तरुण दिसते. आजदेखील करिश्मा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा लहान वयाची दिसते.’
करीनाने पुढे सांगितले की, आनुवंशिक कारणामुळे तिच्या बहिणीचे शरीर खूप सडपातळ आहे. ती कपूर आहे आणि आपल्या आईप्रमाणे दिसते.