आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनासाठी धावून आला रणबीर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपूर कुटुंबाला जरी कतरिना कैफमध्ये आपली सून दिसत नसली, तरी रणबीर कपूरशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे तिची चित्रपटसृष्टीत खास चर्चा आहे. सलमानच्या प्रोटेक्टिव्ह स्वभावाची सावली अजूनदेखील कतरिनासोबत चालत आहे. याच कारणामुळे तिच्या अनेक समस्या आपोआप सुटतात. बर्‍याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीत अफवा होती की, कतरिनाचे 'बँग बँग' आणि 'फँटम' हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहेत. मात्र, 'फँटम'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. खरे म्हणजे डिस्ने/यूटीव्ही 'फँटम'चा वितरक स्टुडिओ असून 'हैदर'ही याच स्टुडिओचा चित्रपट आहे.
स्टुडिओने 2 ऑक्टोबर ही तारीख कॅटरिनाच्या दोन चित्रपटांऐवजी 'बॅँग बॅँग'साठी दिली आहे. त्यासाठी वितरक स्टुडिओने 2 ऑक्टोबर रोजी 'हैदर'ची रिलीज डेट निश्चित केली आहे. गेल्या सोमवारी डिस्ने/यूटीव्हीने देशभरातील आपल्या कार्यालयांना 2 ऑक्टोबर रोजी 'हैदर'साठी चित्रपटगृहे बुक करण्याचा आदेशही दिला आहे. कतरिनाला आपल्या या समस्येतून आता मुक्ती मिळाली आहे. सूत्रांनुसार या बदलामागे तिचा माजी प्रियकर किंवा भविष्यातील पती (?) रणबीर कपूरचा हात असल्याचे मानले जात आहे.