आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींसह सेलिब्रिटींनी ट्विटरवर वाहिली स्मिता तळवलकरांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट.)
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचे दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आज पहाटे त्यांनी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 59 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्मिता ताईंच्या निधनाचे वृत्त पसरताच मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून स्मिता ताईंना श्रद्धांजली वाहिली.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मराठी कलाकारांचे ट्विट...