आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी विश्वाचा थरार 'सॅटरडे संडे', मकरंद देशपांडेंची नवी कलाकृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुन्हेगारी विश्व हा जगभरातील सिनेमांसाठीचा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. गुन्हेगारी विश्वावर अथवा कुविख्यात गुन्हेगारांच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमांनी याआधी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. गुन्हेगारांचे आपापसातले संबंध, त्यांच्यातील संघर्ष, पोलिसांचा दृष्टीकोन, डावपेच, केलेल्या कारवाया आजवर अनेक सिनेमांतून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये या विषयांवर असंख्य सिनेमांची निर्मिती झाली असली तरी मराठीत मात्र क्वचितच असे विषय हाताळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे गुन्हेगारी विश्वावर बेतलेला 'सॅटरडे संडे' हा मराठी अ‍ॅक्शनपट घेऊन येत आहेत. 'अश्विनी राहुल इंटरप्रायजेस' या निर्मिती संस्थेच्या अश्विनी शिरसाट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची घोषणा नुकतीच मुंबईत एका शानदार कार्यक्रमात धमाकेदार पद्धतीने करण्यात आली. यावेळी सिनेमातील कलाकारांनी यातील एका थरारक प्रसंगाचे नाट्यरुपांतर सादर केले. निर्मात्या अश्विनी शिरसाट, लेखक दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोणकोणते सेलिब्रिटी होते हजर -
'ओमकारा', 'सात खून माफ', 'कमीने' सिनेमांचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज, 'तारे जमीन पर'चे दिग्दर्शक अमोल गुप्ते, 'रॉक ऑन', 'काय पो छे'चे दिग्दर्शक अभिषेक कपूर, 'डोंबिवली फास्ट', 'फोर्स' सिनेमांचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत, 'ओह माय गॉड'चे दिग्दर्शक उमेश शुक्ल यांसारखे हिंदीतील नामांकित दिग्दर्शक यावेळी आवर्जून उपस्थिती लावीत या सिनेमाला शुभेच्छा दिल्या. सोबत अभिनेता विनीत शर्मा, अभिनेत्री सई ताम्हणकर, गायक-संगीतकार मिलिंद इंगळे आणि सिनेमातील कलाकार-तंत्रज्ञ याप्रसंगी उपस्थित होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कार्यक्रमाची खास क्षणचित्रे आणि जाणून घ्या सिनेमाविषयी अधिक...