आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना कैफ म्हणते, रणबीरसाठी कायपण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफला काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान खांद्याला इजा झाली होती. तरीदेखील तिने आपल्या 'जग्गा जासूस' या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खंड पडू दिला नाही. हे शूटिंग दक्षिण अफ्रिकेत सुरू असून तिने या वेळी आपल्या खांद्यावरील जखमेची चिंता केली नाही. कारण तिला शूटिंगबरोबरच रणबीर कपूरसोबत वेळ घालवायला मिळत आहे. कतरिनाचा 'बॅँग बॅँग' आणि 'जग्गा जासूस'मधील लूक वेगळा आहे. दोन्ही चित्रपटात आपल्या भूमिका वठवण्यासाठी ती कठोर मेहनत घेत आहे. 'बॅँग बॅँग' मधील कठीण भूमिकेसोबत ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी कतरिनाला यास्मीन कराचीवाला आणि रेजा ट्रेनिंग देत आहेत.
'जग्गा जासूस'मधील तिचे स्क्रीन प्रेझेन्स खास आहे. त्यामुळे आपल्या प्रियकराच्या चित्रपटात कतरिनादेखील काही उणिवा ठेवू इच्छित नाही. चित्रपटाची निर्मिती रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू मिळून करत आहेत.