आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हॅप्पी न्यू ईयर’ च्या प्रचाराद्वारे शाहरुख रुजवणार नवा ट्रेंड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हॅप्पी न्यू ईयर’च्या प्रचारासाठी शाहरुख अमेरिका कॅनडाच्या टूरवर जाणार आहे. या वेळी त्याच्यासोबत सिनेमातील इतर स्टारकास्टदेखील जाणार असून तो सर्व कलाकारांना तेथील शो मध्ये परफॉर्म केल्यानंतर मानधन देणार आहे.
पैशाची गोष्ट येते तेव्हा शाहरुख खानचे एक वक्तव्य नेहमी ठरलेले असते की, मला पैशाचे जास्त महत्व वाटत नाही. मात्र शाहरुख खान सध्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. एकूणच काय तर तो चतुर व्यावसायिकदेखील आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे शाहरुखने आयोजित केलेला स्लॅम कॉन्सर्ट टूर. हा टूर त्याच्या ‘हॅप्पी न्यू ईयर’च्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी शाह‌रुखने जबरदस्त डील करत या टूरमधील शोद्वारे सिनेमा प्रचाराचा नवा फंडा राबवला आहे.
शाहरुखच्या रेड चिलीज कंपनीला अमेरिका आणि कॅनडातील शहरांमधील होणा-या ११ शो मध्ये प्रत्येकी १.२ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास कोटी रुपयांची कमाई होणार आहे. अमेरिकेतील या कार्यक्रमाचे तिकीट ७,००० रुपयांपासून ४५,००० रुपयांपर्यंत आहे. या शोच्या यशस्वितेसाठी तेथील एनाआरआई कंपनी जी शाहरुखची फॅन आहे ती तिकीट खरेदी करत आहे. स्लॅम टूरच्या आयोजकांशी संबंधित असलेल्या एका सूत्राने अमेरिकेहून सांगितले की, ‘शाहरुखला प्रत्येक शोमधून जवळपास १.२ मिलियन डॉलर मिळतील. जर आपण ११ शोच्या फीची बेरीज केली तर यातूनच ‘हॅप्पी न्यू ईयर’चा खर्च निघेल. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नंतर जी काही कमाई होईल ती शाहरुख खानसाठी निव्वळ फायदा असेल.
शाहरुख या शोमधून मिळणारी काही रक्कम अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, सोनू सूद, बोमन ईरानी आणि विवान शहा या अन्य अभिनेत्यांनादेखील देणार आहे. अभिनेत्याला आपल्या सिनेमाचा प्रचार केल्याचे पैसे मिळणार असल्याची बॉलिवूडमधील ही पहिलीच घटना असेल. कदाचित बॉलीवूडमध्ये आगामी काळात हा नवीन ट्रेंड म्हणून देखील नावारूपाला येऊ शकतो.