आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 गुप्तहेर आणि ‘बॉबी जासूस’चा ट्रेलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बॉबी जासूस’च्या ट्रेलर लाँचिगची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या मते या कार्यक्रमाला विद्या बालनसोबत 10 खरे गुप्तहेर उपस्थित राहणार आहेत.
विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. यामध्ये एका हैदराबादी महिला गुप्तहेराचे रंजक पात्र साकारणार्‍या विद्याने शूटिंग पूर्ण होण्यापूर्वी खर्‍या गुप्तहेरांसोबत राहून त्यांच्या कार्यशैलीचा बारकाईने अभ्यास केला. आता सिनेमाचा ट्रेलर लवकरच लॉँच करण्याची तयारी केली जात आहे. विद्या प्रत्यक्षात असलेल्या 10 गुप्तहेरांच्या उपस्थितीत सिनेमा लॉँच करणार आहे. प्रत्येकवेळी संबंधित पात्रांमध्ये राहून सिनेमा प्रमोट करणारी विद्या या वेळी बॅगपॅकसोबत आणि भिकार्‍याच्या वेशात दिसली, तर आश्चर्य वाटायला नको.
‘बॉबी जासूस’ची निर्मिती दीया मिर्झा आणि साहिल संघाच्या ‘बोर्न फ्री एंटरटेनमेंट’ने केली आहे. विद्यासोबत अली फजल प्रमुख भूमिकेत आहे.