आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एनएच-10\'चा Trailor रिलीज, यलो ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अनुष्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी 'एनएच-10' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाद्वारे अनुष्का शर्माने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. गुरुवारी मुंबईतील पीव्हीआरमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात हा ट्रेलर लाँच झाला. यावेळी अनुष्कासोबत नील भूपालम, दिग्दर्शक नवदीप सिंह, निर्माता विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवानी उपस्थित होते.
यावेळी अनुष्का यलो शर्ट आणि स्टायलिश जीन्समध्ये दिसली. तर दुसरीकडे सिनेमात अनुष्कासोबत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता नील भूपालम बाल्ड लूकमध्ये दिसला.
'एनएच-10'चा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा असून येत्या 6 मार्च रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. या सिनेमाला दिग्दर्शकाने अॅक्शनचा तडका दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'एनएच-10'च्या ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...